शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात १७ वर्षीय आर्यनची गळफास घेऊन आत्महत्या…
श्रीरामपुरात १७ वर्षीय आर्यनची गळफास घेऊन आत्महत्या…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड गायकवाड वस्ती परिसरातील मुळा प्रवरा पतसंस्थेच्या समोर राहणाऱ्या आर्यन शांताराम गायकवाड, वय -सतरा वर्ष या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली.
आर्यन हा बेलापूर रोडवरील पेट्रोल पंपा जवळच्या एका गॅरेजमध्ये फिटर म्हणून काम करत होता. आई -वडील घरी नसताना त्याने आत्महत्या करून जीवन संपवले.
या घटनेत मुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे .या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून चालू आहे.