शिवप्रहार न्यूज - कोपरगावातील परजणे वस्तीवर दरोडा;गुन्हे शाखेने दरोडेखोर २४ तासात पकडले….
कोपरगावातील परजणे वस्तीवर दरोडा;गुन्हे शाखेने दरोडेखोर २४ तासात पकडले….
नगर-( प्रतिनिधी)
हकीगत अशी की , फिर्यादी सौ . कविता अनिल सोनवणे वय ५० रा . नऊचारी , संवत्सर , ता . कोपरगाव यांनी दिनांक १५ / ० ९ / २०२२ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी दिली की , दिनांक १५ / ० ९ / २०२२ रोजीचे रात्रीचे ००/४५ वा . चे सुमा . ०७ अनोळखी इसमांनी आमचे घराचा दरवाजा चौकटीमधुन गज घालुन गजाने व ताकदीने आत ढकलुन घरात प्रवेश करुन माझे पती ( १ ) अनिल हरीभाऊ सोनवणे वय ५४ , सासु ( २ ) सुगंधाबाई हरीभाऊ सोनवणे वय ७८ वर्षे , जाऊ ( ३ ) सुनिता बबन सोनवणे वय ५२ वर्षे सर्व रा . नऊचारी , संवत्सर , ता . कोपरगाव अशांना गजाने , चाकुने , लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन आमचे घरातील २,८१,५०० / - रु . किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून घेऊन आमचे घराचे दरवाजाला बाहेरुन कडी लावून पसार झाले आहेत .
सदरबाबत कोपरगाव शहर पो.स्टे . गुरनं २८७/२०२२ भादविक . ३ ९ ५,३ ९ ७ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयाचे तपासाबाबत अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे , पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक , मनोहर शेजवळ , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , संदीप घोडके , मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , विश्वास बेरड , पोलीस नाईक शंकर चौधरी , राहुल सोळुंके , संदीप चव्हाण , दिलीप शिंदे , संदीप दरंदले , ज्ञानेश्वर शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल रंणजित जाधव , योगेश सातपुते ,रविंद्र घुंगासे , विजय धनेधर , मेघराज कोल्हे , चापोहेकॉ / संभाजी कोतकर , बबन बेरड , अर्जुन बडे , चापोकों / भरत बुधवंत अशांनी वारी , सावळीविहीर , रुई गावाचे शिवारात , ता . कोपरगाव संशयीत आरोपींची माहिती घेत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके , यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा आरोपी नामे दिलीप विकास भोसले रा . कारवाडी शिवार , कोकमठाण , ता . कोपरगाव याने त्याचे साथीदारांसह केला आहे .
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वरील पथकासह आरोपीचे टावठकाणाबाबत माहिती काढून कारवाडी शिवार , कोकमठाण , ता . कोपरगाव येथे सापळा लावला . आरोपी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच काही इसम पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने कारवाडी शिवारातून इसम नामे ( ९ ) दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा . काटवाडी , कोकमठाण , ता . कोपरगाव ( २ ) अनिल अरुण बोबडे रा . वेस , ता . राहाता ( ३ ) राहुल दामू भोसले रा . जेऊर पाटोदा , ता . कोपरगाव अशांना ताब्यात घेतले . त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचेइतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत . यापूर्वी वरील ०३ आरोपींविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे आरोपी ९ ) दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा . काटवाडी , कोकमठाण ता . कोपरगाव याचेवर यापुर्वी अहमदनगर जिल्हयात दरोडयासह खुनाचा ०१ गुन्हा दाखल आहे . अ.नं पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम १ राहाता १५ ९ / २०२२ भादविक . ३०२ , ३ ९ ६ , १२० ( ब ) आरोपी २ ) अनिल अरुण बोबडे रा . वेस , ता . राहाता याचेवर यापुर्वी ठाणे , पुणे , मुंबई रेल्वे या ठिकाणी जबरी चोरी , दरोडयाची तयारी , चोरी व इतर या सारखे गंभीर स्वरुपाचे असे एकुण १७ खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . अ.नं १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ पोलीस ठाणे खडकी ( पुणे ) स्वारगेट पुणे स्वारगेट पुणे भांडुप ( ठाणे ) मुलुड ( ठाणे ) बांद्रा रेल्वे १ २ बांद्रा . रेल्वे बांद्रा रेल्वे बंडगार्डन ( पुणे ) बंडगार्डन ( पुणे ) फरासखाना , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) बंडगार्डन , ( पुणे ) गुन्हा रजिस्टर नंबर व कलम ३३०७ / २०१३ मु . पो . अॅक्ट १२२ पोलीस ठाणे गंगापूर , औरंगाबाद लोणी ३०८६/२०१४ मु.पो. अॅक्ट १२२ २३४/२०१४ भादविक . ३ ९९ , ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५ १७३/२०१५ भादविक ३४१,४४७,५०६,५०७ ६७/२०१८ भादविक . ३२३,५०४,५०६,३४ आरोपी ३ ) राहुल दामू भोसले रा . जेऊन पाटोदा ता . कोपरगाव याचेवर यापूर्वी अहमदनगर व औरंगाबाद या ठिकाणी जबरी चोरीचे ०२ गुन्हे दाखल आहेत . अ.नं २० ९९ / २०१ ९ भादविक . ३७ ९ २० ९ ६ / २०१ ९ भादविक . ३७ ९ २० ९ ५ / २०१ ९ भाविक . ३७ ९ ३६२ / २०१ ९ भादविक ३७ ९ , ३४ २२७ / २०१ ९ भादविक . ३ ९ २ ६१/२०२२ भादविक ३७ ९ , ३४ ८३ / २०२२ भाविक ३ ९ २,३४ ८८/२०२२ भाविक ३७ ९ ८ ९ / २०२२ भादविक ३७ ९ ९ ३ / २०२२ भाविक ३७ ९ ९ ४ / २०२२ भाविक ३७ ९ . ९ ५ / २०२२ भादविक ३७ ९ गुन्हा रजिस्टर नंबर व कलम १३ ९ / २०१० भाविक ३ ९ ४.३४ ९ ०७ / २०२० भादविक . ३ ९ २ , ४५२ सह आर्म अॅक्ट ४ / २५ .
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र , नाशिक बी जी शेखर पाटील, अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , उप विभागीय पोलीस अधिकारी , शिर्डी संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे , पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक , मनोहर शेजवळ , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , संदीप घोडके , मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , विश्वास बेरड , पोलीस नाईक शंकर चौधरी , राहुल सोळुंके , संदीप चव्हाण , दिलीप शिंदे , संदीप दरंदले , ज्ञानेश्वर शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल रंणजित जाधव , योगेश सातपुते, रविंद्र घुंगासे , विजय धनेधर , मेघराज कोल्हे , स्थानिक गुन्हे शाखेचे चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर , बबन बेरड , अर्जुन बडे ,स्थानिक गुन्हे शाखेचे चालक पोलीस कॉन्स्टेबल भरत बुधवंत यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.