शिवप्रहार न्यूज- गुप्तधनासाठी बेलापुरात स्फोट घडवून मायलेकीचा खुन ! बाबासह १२ जणांवर गुन्हा ! अघोरी प्रकाराने खळबळ !!
गुप्तधनासाठी बेलापुरात स्फोट घडवून मायलेकीचा खुन ! बाबासह १२ जणांवर गुन्हा ! अघोरी प्रकाराने खळबळ !!
बेलापुर ( शिवप्रहार न्युज ) बेलापूर बु येथे राहणारी विवाहीत महीला ज्योती शशीकांत शेलार व तीची लहान मुलगी नमोश्री शशीकांत शेलार, वय ९ वर्षे या दोघी माय- लेकींचा गुप्त धनासाठी स्फोट घडवून खुन केल्याचे समोर आले असुन मयत ज्योती हीच्या पती व दोन बाबा सह १२ जणावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेने बेलापूरसह श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे ! घटनेच्या वेळी पोलिसांना काही दलाली करणार्यांनी चुकीची माहीती सांगून तपासाची दिशा भरकटवली होती असा त्यावेळी आरोप झाला होता.काल श्रीरामपूर शहर पोलीसात मयत महिलेचे भाऊ राजेन्द्र कचरू नन्नवरे, रा पिपळाचा मळा ,राहुरी यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी नवरा शशीकांत अशोक शेलार ,अशोक ठकाजी शेलार, लीलाबाई अशोक शेलार,बाळासाहेब अशोक शेलार ,कवीता बाळासाहेब शेलार ,पवन बाळासाहेब शेलार, रा-बेलापूर ,काजल किशोर खरात किशोर, सुखदेव खरात ,अनिकेत पाटोळे रा. कोल्हार, गागरे बाबा ,सांगळे बाबा देवकर गुरु यांच्या विरुद्ध भादवि कलम ३o२, २०१ ,३४ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करणे करीता अधिनियम २०१३ चे कलम ३ ' (१ ) . (२ ) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे आरोपींनी संगनमत करून गुप्त धनाच्या लालसेपोटी गॅस गळतीचा स्फोट जानुन बुजुन केला.हा अपघाती मृत्यु नसून हा सर्व प्रकार गुप्त धनासाठी खुन केल्याचा आहे. घटना घडवून आनली पुराव्याची विल्हेवाट लावली असे म्हटले असून कोर्ट आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे! अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शना खाली पोनि गवळी हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान स्फोटाची घटना घडली तेव्हा घरात गॅस सिलेडर व त्याचे पाईप जसेच्या तसे होते. त्याच वेळी काहींनी शंका व्यक्त केली होती .