शिवप्रहार न्युज - स्कुल बस चालकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार! मोबाईल शुटींग ! ! 

शिवप्रहार न्युज -  स्कुल बस चालकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार! मोबाईल शुटींग ! ! 

स्कुल बस चालकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार! मोबाईल शुटींग ! ! 

श्रीगोंदा (शिवप्रहार न्युज) श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील एक १५ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थीनीला घोडेगांव - ते - चांडगांव रस्त्याने सोडत असतांना स्कुल बसचा चालक आरोपी दादा ऊर्फ विकी ऊर्फ चंद्रकांत बाळासाहेब भोसले याने स्कुल बस कच्च्या रस्त्याने नेवून थांबवून विद्यार्थीनीला धमकावून लिंबुनीच्या बागेत नेवून तिचे कपडे काढू नराधम भोसले याने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केला. त्याला साथ देणारा आरोपी योगेश अंबादास माळी याने मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढून विनयभंग केला. 

       त्यानंतर आरोपी विकी भोसलेने पिडीत विद्यार्थिनीला तुझे मोबाईल मधील उघडे-नागडे फोटो दाखवून धमकावून पुन्हा त्याच्या घरी नेवून बलात्कार केला. याप्रकरणी पीडीत विद्यार्थीनीच्या आईने श्रीगोंदा पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी चंदकांत (विकी) बाळासाहेब भोसले व योगेश आबांदास माळी याच्या विरुद्ध बलात्कार व पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तातडीने भोसले व माळी यांना अटक केली असून डीवायएसपी वाखारे,पोनि शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. 

      दरम्यान स्कूल बस चालकानेच अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा प्रकार भरदिवसा घडल्याने पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून स्कुल बस चालकही लिॅग पिसाट निघत असल्याने विद्यार्थीनी शिक्षण घेताना स्कुल बसमध्ये सुरक्षित नाही हे भयाण वास्तव समोर आले आहे .