शिवप्रहार न्युज - राहुरीत मोबाईल चोरणारे श्रीरामपूरचे दोघे पकडले...

शिवप्रहार न्युज -  राहुरीत मोबाईल चोरणारे श्रीरामपूरचे दोघे पकडले...

राहुरीत मोबाईल चोरणारे श्रीरामपूरचे दोघे पकडले...

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींचा राहुरी पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन त्यांना गजाआड केले.

न्यायालयाने त्यांना ०३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

       याबाबत अधिक माहिती अशी की,राहुरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १६ एप्रिल रोजी एका इसमाचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी गेला होता. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस - निरीक्षक पवार, हवालदार सतीश आवारे, सोमनाथ जायभाये,अशोक शिंदे, अजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, संभाजी बडे, रवी पवार, मेढे, पटारे,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन आदी पोलिस पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. 

        दरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे व श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी शाहरुख अफसर शेख व गणेश बाबासाहेब मुंडे, दोघे रा. श्रीरामपूर या दोन संशयितांना ताब्यात घेऊन तात्काळ सदर गुन्ह्यात अटक केली. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना उद्या सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.