शिवप्रहार न्यूज- शिरसगावात चोरट्यांनी दोघांचे डोके फोडले ! खळबळ !

शिरसगावात चोरट्यांनी दोघांचे डोके फोडले ! खळबळ !
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज ) - श्रीरामपुर शहरालगत असलेल्या शिरसगांव येथे ब्राम्हणगाव वेताळ रस्त्यालगत राहणारे श्री.यादव यांच्या घरी कालरात्री ३ वाजता तीन चोरटे घरात घुसले.चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघां चोरट्यांनी लाकडी दांडयांने दोघा यादव भावांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फोडले व छातीवर मारहाण केली.यात रविन्द्र चांगदेव यादव व त्यांचा भाऊ हे जबर जखमी झाले असून यादव यांनी आरडा ओरडा करताच चोरटे पळून गेले.त्यांना ऐवज नेता आला नाही.तसेच चोरट्यांनी गावातील आनंद मुसळे यांच्या घरी चोरी केली.
अशी फिर्याद रविन्द्र चांगदेव यादव या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीसात दिल्यावरून अज्ञात ३ चोरट्यां विरोधात भादवी कलम ३९४ ,३९३ ,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखाल करण्यात आला असून परिसरात नागरीकांमध्ये खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे !
घटना स्थळी डीवायएएसपी संदिप मिटके यांनी भेट दिली.पोनि गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील हे पुढील तपास करीत आहेत . ४ दिवसा पूर्वी अशोक नगर परिसरात चोरटे आले होते.मात्र नागरीक जागे झाल्याने चोरटे पळाले होते . चोरटे तीन पेक्षा जास्त दोते व दरोडेखोर होते असे नागरीक सांगत आहेत .