शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील तरुणाला विप्रोच्या नावाखाली तरुणीने सोळा लाखाला फसवले…
श्रीरामपुरातील तरुणाला विप्रोच्या नावाखाली तरुणीने सोळा लाखाला फसवले…
श्रीरामपूर/शहर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर एक,गोंधवणीरोड गुरुनानकनगर परिसरात राहणारा तरुण अमित त्रिंबक बाचल वय-28 याला विप्रो कंपनीतून बोलते,विप्रो कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देते असे म्हणून विता नावाच्या तरुणीने मोबाईल व्हाट्सअपवर संपर्क करून ऑनलाईन सोळा लाख 51 हजार 300 रुपये घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी अमित याच्या फिर्यादीवरून विता नावाच्या तरुण महिला आरोपी विरुद्ध सायबर पोलिसात भादवि कलम 419,420 आयटी ॲक्ट 66 डी प्रमाणे थकबाजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस चे पोलीस निरीक्षक भोसले हे पुढील तपास करीत आहे.
ऑनलाइन कशाप्रकारे फसवणूक होते हे पुन्हा एकदा या प्रकारातून जनतेसमोर आले आहे.