शिवप्रहार न्यूज-ड्राय डे च्या दिवशी 56,760 रुपयांचा एकुण 20 बॉक्स इतका दारुसाठा जप्त व तीन आरोपी जेरबंद…  

शिवप्रहार न्यूज-ड्राय डे च्या दिवशी 56,760 रुपयांचा एकुण 20 बॉक्स इतका दारुसाठा जप्त व तीन आरोपी जेरबंद…   

ड्राय डे च्या दिवशी 56,760 रुपयांचा एकुण 20 बॉक्स इतका दारुसाठा जप्त व तीन आरोपी जेरबंद…

 

 अकोले- दिनांक 01.05.2022 रोजी महाराष्ट्र दिना निमीत्त लायसनधारी मद्य दुकांनासाठी ड्राय डे असल्याने अकोले शहरात व परिसरात अवैध्य रित्या दारुची विक्री होणार असलेबाबत गोपनिय माहिती अकोले पोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी मिथुन घुगे यांना मिळल्यानंतर त्यांनी पोलीस पथक तयार करुन अकोले शहरात व परिसरात शाहुनगर, सुभाष रोड,अगस्ती कारखाना रोड, आंबेडकर नगर या ठिकाणी अवैध्य दारुची साठवणुक व विक्री करणाऱ्या ठिकांणावर छापे टाकुन 20 देशी दारुचे बॉक्स पकडुन एकुण 56,760 रुपंयाचा देशी दारुचा मुद्देमाल जप्त केला असुन 1)धनेश्वर काशिनाथ पवार रा आंबेडकर नगर अकोले , 2) विलास शंकर पवार रा सुभाष रोड ता अकोले 3) सतिष विलास पवार रा सुभाष रोड ता अकोले 4) उषा शेटीबा पवार रा शाहुनगर, 5) माधुरी गायकवाड रा कारखाना रोड ता अकोले जि अ.नगर यांचे विरुदध अकोले पोलीस स्टेशनमध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

1)गुरनं 187/2022 महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम 65(ई) प्रमाणे.

2)गुरनं 188/2022 महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम 65(ई) प्रमाणे.

3)गुरनं 189/2022 महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम 65(ई) प्रमाणे.

4)गुरनं 191/2022 महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम 65(ई) प्रमाणे.

 वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन दाखल गुन्ह्यातील वरील आरोपींपैकी 3 आरोपींना अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब अकोले न्यायालय यांचे समक्ष हजर केले असुन मा. न्यायालयाने त्यांची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये केली आहे. 

 नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, आपले गावात किंवा परिसरात कोठेही अवैध्य रित्या दारुची विक्री अथवा वाहतुक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे. 

 सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पोहेकॉ महेश आहेर, पोना विठ्ठल शेरमाळे, मपोना संगिता आहेर, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ कुलदिप पर्बत,पोकॉ विजय आगलावे,पोकॉ सुहास गोरे,मपोकॉ मनिषा पारधी यांनी केली असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहेकॉ महेश आहेर हे करीत आहे.