शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर व तालुक्यातील 3 मुली बेपत्ता !

श्रीरामपूर व तालुक्यातील 3 मुली बेपत्ता !
श्रीरामपूर /शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरातून 1 तर जळगाव येथून 2 अल्पवयीन तरुण विद्यार्थिनी मुलींना पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.या घटनांनी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे . श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज जवळून १७॥ वर्षाच्या मुलीला अज्ञात आरोपीने पळवून नेले.आईच्या फिर्यादी वरून शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला . पोनि गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सफौ हापसे हे तपास करीत आहेत तर तालुका पोलीसात जळगांव येथील आईच्या फिर्यादी वरून १७॥ वर्षाच्या मुलीला सकाळी १०-३० अज्ञाताने पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.तर जळगाव येथूनच दुपारी १ वाजता १६ ॥ वर्षाच्या मुलीला आरोपी वैराळ या तरुणाने पळवून नेले.वडीलांनी तशी फिर्याद श्रीरामपूर तालुका पोलीसात दिली.पोनि भोसले यांचे मार्गदर्शना खाली पोउनि निकम व पोलीस मुलींचा व आरोपीचा शोध घेत आहे .