शिवप्रहार न्यूज -सलमान-शाहरुख ला धमकावणारा गँगस्टार रवी पुजारीला १० कोटी खंडणी प्रकरणात अटक; नाशिक न्यायालयाने ७ दिवस कोठडी धाडले...
सलमान-शाहरुख ला धमकावणारा गँगस्टार रवी पुजारीला १० कोटी खंडणी प्रकरणात अटक; नाशिक न्यायालयाने ७ दिवस कोठडीत धाडले...
नाशिक : दहा वर्षा पूर्वी गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्ह्यात गँगस्टार रवी पुजारी यास शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. बिल्डरकडे सुमारे दहा कोटींची खंडणी मागण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुजारीला कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
नाशिक शहरातील वडाळा- पाथर्डी रोडवर एका बांधकाम व्यवसायिकाच्या इमारतीचे काम सुरु अस्ताताना गँगस्टार रवी पुजारी याने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती . खंडणी न दिल्यास गेम करू, अशी धमकी दिली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरच्या कार्यालावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात बांधकाम व्यवसायिकाचा कर्मचारी जखमी झाला होता . याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून नंतर सीआयडी कडे याचा तपास देण्यात येऊन पोलिसांनी चौघा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात रवी पुजारी ,योगेश कल्ल्ली उर्फ सुरेश बंगेरी व भूपेंद्र राजपत्र सिंह हे तिघे फरार होते . मात्र ज्या चार आरोपीना अटक करण्यात आली त्यांच्या विरूद्ध मोक्कांअन्वये नाशिक न्यायालयात खटला चालला असता सरकारी वकील श्री.कोतवाल यांनी युक्तिवाद केला असता तिघांना २०१९ मध्ये जन्मठेप,तर एकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गँगस्टार रवी पुजारी याने पूर्वी सलमान खान,शाहरुख़ खान,महेश भट्ट यांना धमक्या दिलेल्या आहेत.