शिवप्रहार न्यूज - "चायना मांजा" विक्री करणारे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

शिवप्रहार न्यूज - "चायना मांजा" विक्री करणारे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

"चायना मांजा" विक्री करणारे पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

नगर (शिवप्रहार न्युज)- राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोकादायक असलेला 68,600/- रुपये किंमतीचा प्लास्टीक, नायलॉनचा 77 नग चायना मांजा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, मा.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक, नायलॉनचा चायना मांजा विक्री करणारे इसमा विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

 नमुद आदेशान्वये पोनि.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, मपोना/भाग्यश्री भिटे व सारीका दरेकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. पथकाने अहमदनगर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करुन मोनाकिट, हिरोप्लस, मोनो काईट फायटर असे वेगवेगळ्या कंपनीचा 68,600/- (आडुसष्ठ हजार सहाशे) रुपये किंमतीचा 77 नग नायलॉन मांजा मिळुन आल्याने तो जप्त करुन तीन आरोपीं विरुध्द खालील प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं. आरोपीचे नाव जप्तमुद्देमाल

1. कोतवाली 18/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे 1) प्रथमेश राजु करपे रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर 13,300/- मोनाकिट व हिरोप्लस कंपनीचे 16 नग मांजा

2. कोतवाली 24/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे 1) चेतन कन्हैया चिपोळे वय 35, रा. जुना बाजार, हमालवाडा, अहमदनगर 24,000/- मोनाकिट कंपनीचे 27 नग मांजा

3. कोतवाली 28/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे 1) जावेद कासम शेख वय 36, रा. माळीगल्ली, केडगांव, अहमदनगर 31,300/- मोनो काईट फायटर, हिरोप्लस कंपनीचे 34 नग मांजा

एकुण तीन (03) आरोपी 68,600/- 77 नग विविध कंपनीचा प्लास्टीक, नायलॉन चायना मांजा

तसेच यापुढे देखील अवैध चायना मांजाची विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजित पाटील, उविपोल नगर ग्रामिण विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी हानिकारक चायना मांजाऐवजी सुती मांजा वापरावा असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.