शिवप्रहार न्यूज - अशोकनगर जवळ उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

अशोकनगर जवळ उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू...
श्रीरामपूर-तालुक्यातील अशोकनगर परिसरातील वळदगाव रोडवर काल रात्री साडेनऊच्या सुमारास उसाचा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण जाऊन चारीत शिरल्याने पलटी झाला.यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेल्या मजूर परिवारातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.मताचे नाव अमोल बागुल व रविना बागुल असल्याचे समजते.यामध्ये मयत अमोल बागुल यांची पत्नी सपना बागुल व त्यांचे तान्हे बाळ हे देखील जखमी झाले आहे.
उसाच्या ओव्हरलोड ट्रॅक्टरमुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे एपीआय विठ्ठल पाटील, पोलीस नाईक अहिरे, पोलीस शिपाई गायकवाड ,कांबळे यांच्या पथकाने अपघातग्रस्तांना तात्काळ सहकार्य केले.जखमींवर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार चालू असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांकडून पुढील कारवाई चालू आहे.
ओव्हरलोड ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी प्रशासन अजुन असे किती मानवी जीव हाकनाक बळी जाण्याची वाट पाहणार ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडुन विचारला जात आहे.