शिवप्रहार न्युज - मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

शिवप्रहार न्युज - मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

नगर (शिवप्रहार न्युज)- स्थानिक गुन्हे शाखेने काल 3 गावठी कट्यासह मध्यप्रदेशातील आरोपीला शिताफीने पकडण्याची कामगिरी केल्यानंतर आज पुन्हा मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्याची कामगिरी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अल्ताफ अल्हाउदीन बागवान, वय 25, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, नगर यांना यातील आरोपी नामे अभिषेक भिंगारदिवे, गणेश काळे, प्रेम नरेंद्र भाकरे, किरण पालवे, नावीन्या भाकरे, दिपक बेरड, आशिष भाकरे सर्व रा. नवनागापुर अहमदनगर यांनी दि.17/03/22 रोजी फोन करुन सेंट मेरी चर्च, नागापुर येथे बोलावुन घेवुन बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडुन, चाकुने वार करुन जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटने बाबत एमआयडीसी पोस्टे गु.र.नं. 178/22 भादविक 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 120 (ब) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)/135 व आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये वाढीव कलमांचा 3 (1) (I), 3 (2), 3 (4) अंर्तभाव करण्यात आला होता. मा.राकेश ओला, पोलीस अधिक्षक नगर यांनी पोनि.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना जिल्ह्यातील मोक्क्यात फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुण मोक्का फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नगर तालुका परिसरात पेट्रोलिंग करुन मोक्का फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे संतोष धोत्रे हा गांधी नगर, एमआयडीसी परिसरात येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि.अनिल कटके यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथक गांधी नगर परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम येताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संतोष रघुनाथ धोत्रे, वय 25, रा. नागापुर, एमआयडीसी अहमदनगर असे सांगितले. त्याचेकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे संतोष धोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर व ठाणे जिल्ह्यात मोक्का, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, पोक्सो, गंभीर दुखापत, आर्मॲक्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण-15 गुन्हे दाखल आहेत.

 सदरची कारवाई मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, नगर व श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.