शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात आरोपीने घेतले विष;अटके पूर्वीच विष घेतल्याचा पोलिसांचा दावा…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात आरोपीने घेतले विष;अटके पूर्वीच विष घेतल्याचा पोलिसांचा दावा…

श्रीरामपुरात आरोपीने घेतले विष;अटके पूर्वीच विष घेतल्याचा पोलिसांचा दावा…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर पोलिसांनी गंठण चोरी प्रकरणात मनोज रावसाहेब चव्हाण ,राहणार सरस्वती कॉलनी याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले.परंतु रात्री त्याला त्रास जाणवू लागल्याने व आरोपीने विष पिल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी साखर कामगार रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले.

       परंतु तेथील डॉक्टरांनी नगर सिव्हिल येथे आरोपीला हलवण्याची सूचना केली.नगर सिविल येथे देखील बेड उपलब्ध नसल्याने शेवटी आरोपीला पुणे येथे हलविण्यात आले. 

       यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांनी सांगितले की,आरोपी अटक करण्यापूर्वी त्याची कायदेशीर रित्या वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.त्यामध्ये डॉक्टरांच्या निदर्शनास विष घेतले असल्याचे आढळले नाही.त्यामुळे अटक करण्यापूर्वी आरोपीने विष घेतले असावे. 

       दरम्यान या आरोपीवर उपचार चालू आहेत असून उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल.