शिवप्रहार न्यूज - काल गाईंचे प्राण वाचवण्याचे काम केले शिवप्रहारच्या मावळ्यांनी अन् श्रेय घेण्याचे काम करतायेत श्रीरामपुरातील राजकीय नेत्याने पाळलेले बाजारबुणगे…

शिवप्रहार न्यूज - काल गाईंचे प्राण वाचवण्याचे काम केले शिवप्रहारच्या मावळ्यांनी अन् श्रेय घेण्याचे काम करतायेत श्रीरामपुरातील राजकीय नेत्याने पाळलेले बाजारबुणगे…

काल गाईंचे प्राण वाचवण्याचे काम केले शिवप्रहारच्या मावळ्यांनी अन् श्रेय घेण्याचे काम करतायेत श्रीरामपुरातील राजकीय नेत्याने पाळलेले बाजारबुणगे…

श्रीरामपूर - काल 28 डिसेंबर रोजी “शिवप्रहार प्रतिष्ठान” संघटनेच्या मावळ्यांनी राहुरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पाथरे गाव परिसरात गाई व गोवंशांना कत्तलीसाठी घेऊन चाललेले अशोक लेलँड वाहन क्रमांक एम एच 16 सी सी 3966 याची माहिती पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करून घेतला.परंतु या कामगिरीचे श्रेय घेण्याचे काम श्रीरामपूर शहरातील एका राजकीय नेत्याने पाळलेले बाजारबुणगे करत असताना दिसून आले.सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकून ही कामगिरी आपण केल्याचा बोभाटा मांडला आहे.

     या घटनेचे अधिक माहिती अशी की,शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे विशाल दौंड,उदय लिपटे,पाथरेचे सरपंच नवनाथ टेकाळे,सेनेचे बापू शेरकर इत्यादी मावळ्यांनी मिळून हि कामगिरी करून महत्त्वाची भूमिका बजावली व शिवप्रहार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर (चंदू)आगे यांनी याप्रकरणी तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध करून दिली.सर्वप्रथम त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय श्री.थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,नमूद गावाची हद्द ही राहुरी पोलीस स्टेशनकडे आहे.त्यामुळे लगेच चंदू आगे यांनी श्रीरामपूर उपविभागाचे डी.वाय.एस.पी. श्री.संदीप मिटके यांना व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देखील तात्काळ फोन करून या घटनेची माहिती देवुन पोलीस मदत मागितली.त्यावर त्यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले व पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

      त्यानुसार राहुरीतील गोसेवक आप्पासाहेब नाईकवाडी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आणि या गाई व गोवंशांची सुटका झाली.

      अशी या प्रकरणाची सत्य हकीकत असतांना श्रीरामपूर शहरातील एका राजकीय नेत्यानी पाळलेल्या या संघटनावाल्यांनी ही कामगिरी आपण केल्याचा थाट मिरवत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या. एका नेत्याने पाळलेली ही संघटना कायम आपल्या जातीच्या नेत्यासाठी काम करते व जगाला हिंदुत्व करत असल्याचा दिखावा केला जातो.

       हि संघटना खरंच हिंदुत्ववादी असती तर “शिवप्रहार प्रतिष्ठानच्या” लव्ह जिहाद विरोधी "श्रीरामपूर शहर बंद"ला पाठिंबा देण्याऐवजी "स्वतःचे दुकाने उघडे ठेवून" एक प्रकारे हिंदू मुलीविरोधात भुमिका घेवुन निर्लज्जपणाचा कळस केला नसता. हिंदू-हिंदू म्हणून लोकांना विविध कार्यक्रमाला बोलवायचे आणि हिंदू अडचणीत असेल तेव्हा घरात शेपूट घालून बसायचे ही यांची वृत्ती आहे.फक्त स्वतःच्या जातीच्या नेत्यासाठी यांची श्रद्धा आहे अशी स्पष्ट टीका शिवछत्रपतींचे अठरापगड जातीचे शिवहिंदुत्व मानणाऱ्या “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या एका मावळ्याने केली आहे.

     तसेच दुसरीकडे काल रोजीच धर्मयोद्धा संघ ,वेरूळ ,जिल्हा-छ.संभाजीनगर व “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या मावळ्यांनी लाडगाव,वैजापूर येथे ०७ गाईंचे प्राण वाचवण्याची कामगिरी केली.याप्रकरणी वीरगाव ,जिल्हा -छ.संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.