शिवप्रहार न्यूज - आरटीओच्या कामात आरिफचा आडथळा; गुन्हा दाखल

शिवप्रहार न्यूज - आरटीओच्या कामात आरिफचा आडथळा; गुन्हा दाखल

आरटीओच्या कामात आरिफचा आडथळा; गुन्हा दाखल

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक टेस्ट ट्रॅकवर गाडी घेवून येत असताना तेथे आपली मोटारसायकल घालून 'माझी गाडी अगोदर चेक करा' म्हणत नडणाऱ्या आरिफ नावाच्या व्यक्तीवर श्रीरामपूर शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत सुनील भाऊसाहेब गोसावी, मोटारवाहन निरीक्षक, नेमणुक-उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. १५ फेब्रुवारी रोजी आपण अतुल गावडे, गणेश राठोड, विकास लोहकरे, श्रीमती शितल तळपे, श्रीमती सुजाता बाळ सराफ, रोहीत पवार (सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) असे आम्ही सर्वजण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण करण्याचे कामकाज परिवहन कार्यालयासमोरील टेस्ट ट्रॅकवर करत होतो. त्यावेळी दुपारी ४.१५ च्या सुमारास सहा.मोटार वाहन निरीक्षक रोहीत पवार यांना आपण १ वाहन ब्रेक टेस्ट करण्याकरीता टेस्ट ट्रॅकवर चालवत घेवून येण्यास सांगितले. तेव्हा पवार हे वाहन टेस्ट ट्रॅकवरून चालवत घेवून येत असताना एक आरिफ नावाचा इसम त्याची मोटारसायकल टेस्ट ट्रॅकवर आडवी लावून पवार चालवित घेवून येत असलेल्या ब्रेक टेस्ट करण्याच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. तेव्हा आरिफ यास तुम्ही ट्रॅकवरून मोटारसायकल बाजूला काढा, असे सांगितले असता त्याने माझी गाडी अगोदर चेक करून घ्या, असे म्हणून टेस्ट ट्रॅकवर मोटारसायकल तशीच उभी करून कामकाजात अडथळा निर्माण केला.

  याप्रकरणी सुनील गोसावी यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत मोटारसायकल क्र.एमएच १७ एक्स १०४५ वरील चालक आरिफ (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात भादंवि कलम ३४१, ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.