शिवप्रहार न्यूज - "शिवसेना" नाव व "धनुष्यबाण" चिन्ह शिंदे गटाला; लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता

शिवप्रहार न्यूज - "शिवसेना" नाव व "धनुष्यबाण" चिन्ह शिंदे गटाला; लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता

"शिवसेना" नाव व "धनुष्यबाण" चिन्ह शिंदे गटाला; लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता

मुंबई (शिवप्रहार न्यूज)- गेल्या वर्षी राज्यात झालेले सत्तांतर आणि शिवसेनेमध्ये पडलेली फुट यामुळे शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणा बाबतचा वादग्रस्त विषय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. दरम्यानच्या काळात हा विषय सर्वोच्च न्यायालयात देखील गेला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेईल अशी टिपणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने आज दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या विषयासंदर्भात आपला निकाल जाहीर केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या गटाला "शिवसेना" हे नाव व "धनुष्यबाण" हे चिन्ह देण्याचे या निकालात म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना या निकालामुळे मोठा फटका बसल्याचे दिसते. कारण त्यांच्या हातातून आता शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह निसटले आहे. दरम्यान महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या लांबलेल्या निवडणुका या आयोगाच्या निकालामुळे लवकर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.