शिवप्रहार न्यूज- लाखो रुपयांची “गांजा”ची शेती करतांना नगर LCB ने आवारीला धरले…
लाखो रुपयांची “गांजा”ची शेती करतांना नगर LCB ने आवारीला धरले…
नगर- नगर स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB)पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,पारनेर तालुक्यातील रांधे शिवारात काशिनाथ दत्तात्रय आवारी याच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजाची झाडे लावण्यात आलेली आहे.
त्यानुसार अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून आरोपी काशिनाथ आवारीला धरुन त्याच्याकडुन एकूण तीन लाख 65 हजार रुपयांचे गांजाची झाडे जप्त केली.तसेच आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा देखील दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.