शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरातील गोंड आदिवासी समाजाच्या प्रश्नात महामहिम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू घालणार लक्ष -जामकर…

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरातील गोंड आदिवासी समाजाच्या प्रश्नात महामहिम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू घालणार लक्ष -जामकर…

श्रीरामपुरातील गोंड आदिवासी समाजाच्या प्रश्नात महामहिम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू घालणार लक्ष -जामकर…

 नवी दिल्ली /श्रीरामपूर ( शिवप्रहार न्यूज ) महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आदिवासी गौंड समाजाच्या जीवन -मरणाच्या हलाखीचे जीवन जगत असलेल्या विविध समस्या आज हिंदुस्तानच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्यासमोर आदिवासी गौंड समाजाचे महाराष्ट्रातील नेते रंजीत जामकर - श्रीरामपूर - गोपीचंद कुमो ,संभाजीनगर शामू पुसनाके ,विशाल महाराज -दोघे कर्नाटक यांनी मांडल्या. 

     राष्ट्रपती द्रोपती देवी मुर्म यांच्या समक्ष भेटीत गोंड आदिवासी समाजाचे श्रीरामपूर येथील नेते रणजीत जामकर यांनी आदिवासींना राहायला जागा नाही ! घरे नाही ! कामधंदा नाही ! अन्न पाण्याची अडचण ! स्वच्छता गृह नाही !अनेक वर्षापासून ते श्रीरामपुरात हलाकीचे जीवन जगत आहे.शेकडो आदिवासी महीला पुरुष नागरिक परंपरागत काबाडकष्ट करून जीवन जगतात ! मात्र प्रशासनाकडून व सरकारकडून राजकारण्यांकडून त्यांना कोणतीही मदत अथवा साथ मिळत नाही.शेती महामंडळाच्या सरकारी जमिनी आदिवासी गोंड समाजाला कसण्यासाठी द्याव्यात घरासाठी जागा द्याव्यात ! त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी ! शिक्षणाची व्यवस्था करावी त्यांच्या मुलांना कुपोषित होण्यापासून वाचवावे !अशा विविध जिव्हाळ्याचे प्रश्न राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांच्यासमोर मांडले.त्यांनी यावेळी उपस्थितांना तुमच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नात मी स्वतः लक्ष घालील असे आश्वासन दिले .यावेळी रणजीत जामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदुस्तानच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . 

      आदिवासी गोंड समाजाच्या सामान्य नेते कार्यकर्त्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेऊन आदिवासी समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंबंधीभूमिका मांडण्याचा योग आला संधी मिळाली ती खरोखरच आमच्यासाठी एक दैवी आशीर्वादच होता ! अशा शब्दात रणजीत जामकर यांनी राष्ट्रपतींच्या भेटीचे तोंडभरून कौतुक केले व अभिमानाने राष्ट्रपतीद्रोपदी मुर्मु यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .