शिवप्रहार न्युज- पाळणेवाल्यांसह जागा मालकाविरूद्ध गुन्हा दाखल...
पाळणेवाल्यांसह जागा मालकाविरूद्ध गुन्हा दाखल...
शिर्डी (शिवप्रहार न्युज) - शिर्डी येथील श्रीरामनवमी यात्रेत झालेल्या पाळणा अपघातात तिघे यात्रेकरू गंभीर जखमी झाल्याप्रकरणी पाळणा चालवणारा तसेच पाळणा घेणारा ठेकेदार आणि जागा मालक यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोकॉ. सतपाल दत्तू शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास श्रीसाईबाबा प्रसादालयासमोरील पार्कींगमध्ये लावण्यात आलेल्या पाळण्याचा अपघात होवून पाळण्याची एक बकेट खाली पडल्याने त्यात तिघेजण तुटून ती जखमी झाले. पैकी एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर पाळणा हा शिवाजी अर्जुन भोसले यांच्या मालकीचा असून 'तो पाळणा चालवणारा ऑपरेटर अजय शिवाजी भोसले हा होता. सदर पाळणा लावण्यासाठीची 'जागा ही रमेश, विजय व किशोर. भाऊसाहेब गोंदकर, रा.शिर्डी यांच्या मालकीची असून त्यांनी सदर जागा ही पाळण्याचे चालक हसन अब्दुल सय्यद यांना करार करून सदर पाळणा चालवण्यासाठी दिली होती. याप्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी अर्जुन भोसले, रा. वाडेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर (चालक), हसन अब्दुल सय्यद, रा. श्रीरामनगर, शिर्डी व जागेचे मालक, संयोजक किशोर भाऊसाहेब गोंदकर, रमेश भाऊसाहेब गोंदकर, विजय भाऊसाहेब गोंदकर, रा. शिर्डी यांनी सदर पाळणा चालवण्यासाठी शासनाची परवानगी न घेता पाळण्याचेफिटनेस तपासणी करून ने घेता तो चालण्यासाठी सुस्थितीत आहे किंवा कसे? याबाबत काळजी न घेता व निष्काजीपणाने बेदरकारपणाने व हयगयीने चालवल्यामुळे त्याची बकेट तुटून झालेल्या अपघातास कारणीभूत होवून पाळण्यामध्ये बसलेल्या यात्रेकरूंची सुरक्षितता धोक्यात आणून यातील जखमींच्या गंभीर दुखापतींना कारणीभूत झाले म्हणून वरील लोकांविरोधात भादंवि कलम २७९, ३३६, ३३७, ३३८ प्रमाणे शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.