शिवप्रहार न्यूज- भारताचे सरन्यायाधीश श्री.उदयजी लळीत यांचे नेवाश्याशी जवळचे नाते…
भारताचे सरन्यायाधीश श्री.उदयजी लळीत यांचे नेवाश्याशी जवळचे नाते…
नेवासा(प्रतिनिधी)भारताचे सरन्यायाधीश श्री.उदयजी लळीत यांचे सख्खे चुलते हे नेवाशाचेच असल्याने बालपणी ते आपल्या चुलते विधीतज्ञ स्वर्गीय अँड.सुभाष लळीत यांच्या घरी येत असे.येथे आल्यानंतर ते नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील भगवान दत्तात्रयांच्या तसेच नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जात असे अशी माहिती त्यांच्या चुलती(काकी) नेवासा येथील रहिवासी श्रीमती सुनीताताई लळीत आमच्या प्रतिनिधीशी सुसंवाद साधतांना सांगितले.त्यांनी सरन्यायाधीश श्री उदयजी लळीत यांच्या येथील आठवणींच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
सरन्यायाधीशपदी आपले पुतणे उदयजी लळीत यांची नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी माहिती देतांना श्रीमती सुनीताताई लळीत म्हणाल्या की,आमचे मोठे दिर न्यायाधीश श्री उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.आमचे सासरे हे वकिली व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड येथून सोलापूरला आले व तेथेच स्थायीक झाले.त्यांचे द्वितीय चिरंजीव अँड.सुभाष लळीत हे मूळचे नेवासा येथेच वास्तव्य असल्याने वकिली व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही येथे स्थायिक झालो. सरन्यायाधीश झालेले माझे पुतणे उदय लळीत हे तसे धार्मिक वृत्तीचे आहे.पुणे येथे असतांना त्यांनी आळंदी ते पुणे अशी पायी वारी अनेकदा केली आहे.माऊली भक्त असलेल्या सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाचे नाव देखील त्यांनी माऊली" असे ठेवले आहे.
नेवासा येथे आमच्या घरी आल्यानंतर ते न चुकता नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ,शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जात असे.तसे आमचे सर्व कुटुंब हे वकिली व्यवसायातीलच असल्याने उपेक्षित व वंचीत घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही केले व करत असल्याचे श्रीमती सुनीताताई लळीत यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
सरन्यायाधीश म्हणून उदय लळीत यांनी दिल्ली येथे आपल्या पदाची सूत्रे हाती घेतेवेळी ललित कुटुंबातील सदस्य अमिता उदय लळीत,सुनीता सुभाष लळीत,सविता शिरीष लळीत,सुचित्रा उमेश लळीत,डॉ.मानस सुळे,सुचित्रा मोडक, शर्मिला प्रदक्षिणे,सुनील प्रदक्षिणे,राजश्री प्रदक्षिणे,श्रीकांत जवळगेकर,राहुल धडपले उपस्थित होते.
दरम्यान श्री.उदय लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नेवासा येथील लळीत परिवारातील सदस्य श्रीमती सुनीताताई लळीत,बंधू राजेश लळीत,वहिनी तृप्ती लळीत यांनी पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला.यावेळी नेवासकरांनी देखील लळीत परिवाराचे अभिनंदन केले.