शिवप्रहार न्युज - कर्ज वसुली अधिकाऱ्याला ऑनलाइन लाच घेताना पकडले...

शिवप्रहार न्युज -  कर्ज वसुली अधिकाऱ्याला ऑनलाइन लाच घेताना पकडले...

कर्ज वसुली अधिकाऱ्याला ऑनलाइन लाच घेताना पकडले...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- नगर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला ऑनलाइन सात हजार रुपयाची लाच घेताना पकडल्याने लाच घेणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    अधिक माहिती अशी की, तक्रारदार याने एका पतसंस्थेतून पाच लाखाचे कर्ज घेतले होते. पाच वर्षे झाली तरी कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सुनावणी ठेवण्यात आली होती. तालुका पतसंस्था फेडरेशन चा विशेष वसुली व विक्री अधिकारी यासिन नासर अरब याने तक्रारदाराला फोन करून मी तुला कर्ज फेड करण्यासाठी मुदत दिली, तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही म्हणून तीस हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी काल शुक्रवारी यासीनला सात हजार रुपयांची ऑनलाइन फोन पे वरून लाच घेताना पकडले आहे.

   सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्यासह पोलिस अंमलदार रमेश चौधरी, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, दशरथ लाड यांनी केली.