शिवप्रहार न्युज - बँकेत खाते नसतांना कोणीतरी १० लाख कर्ज काढले; त्याविरोधात गांधी पुतळ्याजवळ उपोषणास बसले तर गंठणचोरांनी गंठण मारले...

शिवप्रहार न्युज -  बँकेत खाते नसतांना कोणीतरी १० लाख कर्ज काढले; त्याविरोधात गांधी पुतळ्याजवळ उपोषणास बसले तर गंठणचोरांनी गंठण मारले...

बँकेत खाते नसतांना कोणीतरी १० लाख कर्ज काढले; त्याविरोधात गांधी पुतळ्याजवळ उपोषणास बसले तर गंठणचोरांनी गंठण मारले...

श्रीरामपूर-तालुक्यातील खैरी निमगाव येथील रहिवासी राजू चंद्रभान शिंदे यांचे बँकेमध्ये खाते नसताना कोणीतरी त्यांच्या नावाचा गैरवापर करून दहा लाखाचे कर्ज काढले.या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी म्हणून शिंदे हे त्यांच्या पत्नी सुनीता यांच्यासह श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर उपोषण आंदोलनास बसले.

     आंदोलन करत असताना त्यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्यातील गंठण व पाकिटातील सात हजार रुपये असे चोरट्यांनी पळून नेले. याबाबत तक्रार करण्यासाठी या आंदोलक दांम्पत्याला पोलीस स्टेशनच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. 

      या गोरगरीब आंदोलक दाम्पत्याची परिस्थिती अशी झाली आहे की,"इकडे आड आणि तिकडे विहीर" कारण कोणीतरी त्यांच्या नावाचा वापर करून दहा लाख रुपयाचे कर्ज काढले.त्याच्या विरोधात आंदोलन करावे तर आहे ते गळ्यातील गंठण व सात हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले.