शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात बायको, सासू आणि मेव्हण्यांच्या त्रासाला कंटाळून एकाचा गळफास

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात बायको, सासू आणि मेव्हण्यांच्या त्रासाला कंटाळून एकाचा गळफास

श्रीरामपूरात बायको, सासू आणि मेव्हण्यांच्या त्रासाला कंटाळून एकाचा गळफास

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - बायको, सासू आणि बायकोच्या भावांच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपुरात एका विवाहीत तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रकार संजयनगर परिसरात घडला आहे.

  याबाबत, जैबुन्निसा मेहबूब पठाण, वय - ७०, रा. संजयनगर, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मुलगा अकील याला संजयनगर येथे बायको, सासू, सूनेचा भाऊ आणि मामाचा मुलगा हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे सर्व त्याला वाद घालून त्रास देत होते, मारहाण करीत होते. दि. २४ फेब्रुवारी रोजी ८ च्या सुमारास अकील याची बायको समीरा व सासू यांच्यामध्ये परत वाद झाले. तेव्हा मुलगा अकील हा घरातील बेडरूममध्ये गेला व आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर आरडाओरडा झाल्याने आसपासचे लोक आले तेव्हा आतून दरवाजा लावलेला होता. माजी नगरसेवक राजेंद्र पवार, सनी खांदे, सुरज सोनवणे यांनी हा दरवाजा तोडला असता अकील याने सिलींग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला हॉस्पीटलमध्ये नेले असता तो तत्पूर्वीच मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

  याप्रकरणी मयत आकीलच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी समीरा अकील पठाण, आरीफा सलिम सय्यद, समीर हानीफ शेख, शहारूख सलिम संय्यद यांच्याविरोधात भादंवि कलम ३०६, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.