शिवप्रहार न्युज - जर्मनीतील विश्व धर्म संमेलनात आपल्या श्रीरामपूर-बेलापूरच्या स्वामी गोविंददेवगिरींचा (आधुनिक स्वामी विवेकानंद)सहभाग…

शिवप्रहार न्युज -  जर्मनीतील विश्व धर्म संमेलनात आपल्या श्रीरामपूर-बेलापूरच्या स्वामी गोविंददेवगिरींचा (आधुनिक स्वामी विवेकानंद)सहभाग…

जर्मनीतील विश्व धर्म संमेलनात आपल्या श्रीरामपूर-बेलापूरच्या स्वामी गोविंददेवगिरींचा (आधुनिक स्वामी विवेकानंद)सहभाग…

बेलापूर (प्रतिनिधी) - अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी समितीचे खजिनदार,येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरी महाराज तथा 

आधुनिक स्वामी विवेकानंद यांनी ज़र्मनीतील बर्लिन येथे झालेल्या विश्व सर्व धर्म संमेलनात नुकताच सहभाग घेतला. 

       तीन दिवस चाललेल्या या बहुधर्मीय संमेलनात जगातील विविध देश आणि धर्मातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.त्यात भारताच्या वतीने हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणून स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज सहभागी झाले होते.या संमेलनात हिंदू ,मुस्लिम, ख्रिश्चन आदींसह अन्य बहुधर्मीय धर्मगुरूंनी जागतिक व्यासपीठावर आपापल्या धर्माची बाजू मांडून विचारमंथन व धार्मिक आदान-प्रदान केले.

      गेल्या वर्षीही इंडोनेशिया येथील धर्म परिषदेत भारताच्यावतीने स्वामी गोविंददेवगिरी यांनी हिंदु धर्म प्रतिनिधी म्हणुन सहभाग घेतला होता.ही सुखद बातमी मिळताच बेलापूर गाव व श्रीरामपूर परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला.