शिवप्रहार न्युज - बंधुभाव जोपासून धर्मकार्य पुढे न्या - स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचे अमेरिकेत प्रतिपादन ….

शिवप्रहार न्युज - बंधुभाव जोपासून धर्मकार्य पुढे न्या - स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचे अमेरिकेत प्रतिपादन ….

बंधुभाव जोपासून धर्मकार्य पुढे न्या - स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचे अमेरिकेत प्रतिपादन ….

श्रीरामपूर/बेलापूर (वार्ताहर) हिंदु धर्मावर आजवर अनेक आघात झाले.तरीही पुन्हा पुन्हा अधिक उभारी घेऊन धर्म पुढे जात आहे. धर्माला साक्षात परमेश्वराचे अभय असल्याने तो चिरंतन अविनाशी आहे.मात्र धर्मात दरी निर्माण करण्याचे पाप टाळून सर्वांनी आपापसात बंधुभाव जोपासावा आणि पवित्र धर्मकार्य पुढे न्यावे असे आवाहन श्रीरामपूर/बेलापूरचे भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरी यांनी अमेरिकेतील प्रवचनात केले.

    अमेरिका येथील स्वामी नारायण संप्रदायाच्या मार्फत उभारलेल्या भव्य दिव्य अशा अक्षरधाम मंदिराला भेट देऊन त्यांनी दर्शन घेऊन तृप्त झाल्याचे सांगितले. भारतीय संस्कृती जाणुन घेण्यासाठी भारतात येण्याआधी ती अमेरिकेतील श्री. स्वामीनारायण संस्थानच्या अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखालील संप्रदायाच्या अक्षरधाम मंदिराच्या सूक्ष्म दर्शनातूनही भारतीय संस्कृतीचे व्यापक दर्शन निश्चित जाणुन घेता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली.

     ते पुढे म्हणाले की,प्रकाश फक्त, फक्त आणि फक्त भारतातूनच येतो असे ठासुन सांगत त्यांनी इंडिया नावाचा उल्लेख आवर्जुन टाळला. भारतात अनेक संप्रदाय, परंपरा, प्रथा, उपासना पद्धती, आचार विचार असुनही "भारत माता एक आणि हिंदु धर्म एक" असुन आपसातील छोटे मोठे मतभेद विसरुन तो सर्वांना सोबत घेऊन पुढे न्यायचा आहे. धर्मात कोणत्याही कारणाने दरी निर्माण होणार नाही असा संकल्प करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

      स्वामी नारायण अध्यात्मिक परिवाराद्वारे गुरूंच्या कृपाशीर्वादाने भारतासह अमेरिकेतही व्यापक दृष्टिकोन ठेऊन विशाल कार्य साकारले जात आहे. आपण अनेक भाषा, रीती रिवाज धर्म, परंपरा, देवी, देवता यामध्ये वावरत असतो. मात्र आमचे हुदय हे केवळ हिंदुत्वाचे आहे याची अनुभुती या अक्षरधाम मंदिरातुन अनुभवायला मिळते.तसेच वर्तमान युगातील नव्या पिढीतील मुलांना येथे हिंदु धर्माचे खरे दर्शन घडते.त्यामुळे त्यांच्यात राष्ट्र,धर्म, संस्कृतीबद्दल आदरभाव शंभर पटीने वाढत आहे. असे गौरवोद्गारही स्वामींनी अमेरिकास्थित उपस्थित हजारो भाविक भक्तांपुढे प्रवचन करताना काढले. गेल्या सत्तावीस वर्षांपासून स्वामी गोविंददेवगिरी हे अमेरिकेत धर्माकार्यासठी जात आहेत.

     अमेरिकेतील रॉबिन्सविल्ले, न्यु जर्सी, नॉर्थ अमेरिका येथे स्वामीनारायण परिवाराचे अध्यात्मिक गुरु स्वामी भद्रेशदास मुनिजी यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षरधाम मंदिरात हा प्रवचन सोहळा संपन्न झाला.