शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात गुटखा पकडला, रमीजला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
श्रीरामपुरात गुटखा पकडला, रमीजला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला, हिरा पानमसाला व तंबाखुचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला असून आरोपी रमीज इक्बाल मेमन याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/गणेश भिंगारदे व ज्ञानेश्वर शिंदे अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुगंधीत तंबाखु विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पथक माहिती घेताना दि.06/11/23 रोजी पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रमीज इक्बाल मेमन रा. दशमेश नगर, श्रीरामपूर याने त्याचे राहते घराचे खोलीत गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखुचा साठा केला असुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, पोनि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पाहाणी करता एक इसम घराजवळ संशयीतरित्या उभा असलेला दिसला पथकाची खात्री होताच संशयीतास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यास संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन, त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव रमीज इक्बाल मेमन वय 21, रा. दशमेश नगर, जुनी महाराष्ट्र बॅके मागे, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. पथकाने संशयीतास झडतीचा उद्देश कळविताच संशयीताने सदर घराची बंद रुम उघडली त्यावेळी रुमची झडती घेतली असता त्याचे कब्जात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला, हिरा पानमसाला व तंबाखु मिळुन आली त्याबाबत आरोपींकडे विचारपुस करता त्यांनी सदर माल हा त्याचे मालकीचा असुन विक्री करण्याचे उद्देशाने साठवुन ठेवला आहे अशी माहिती दिल्याने आरोपीस महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुंगधीत तंबाखु असा एकुण 18,600/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1176/23 भादविक 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.