शिवप्रहार न्युज - अनुदान वाटपात अनियमितता ठेवल्यावरून राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत निलंबित…

शिवप्रहार न्युज -  अनुदान वाटपात अनियमितता ठेवल्यावरून राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत निलंबित…

अनुदान वाटपात अनियमितता ठेवल्यावरून राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत निलंबित…

श्रीरामपूर/राहुरी -राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी मालेगाव येथे कर्तव्यावर असताना सन 2020 मध्ये अतिवृष्टी झालेल्या नागरिकांना अनुदान वाटपात अनियमितता केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अन्वये सचिव राणे यांनी निलंबित केले आहे.

     निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय हे असेल असे या निलंबन आदेशात म्हटले आहे.या घटनेमुळे महसूल प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.अवर सचिव श्री.राणे यांनी हे आदेश काढले आहेत.