शिवप्रहार न्यूज- ओवरब्रिज जवळ गाडीभर सोयाबीन व रोकड लुटली …
ओवरब्रिज जवळ गाडीभर सोयाबीन व रोकड लुटली …
श्रीरामपूर - श्रीरामपुर शहरातील नेवासारोड वर असणाऱ्या ओव्हर ब्रिजवर दोन मोटरसायकल वरील आरोपींनी सोयाबीनची पिकप गाडी अडवून नेवासा रोड दिशेने पळून नेली व सोयाबीन गाडी चालकाचे साडेतीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. हजारो रुपयांचे सोयाबीन चोरल्यानंतर आरोपी त्याठिकाणाहून पसार झाले.
याप्रकरणी पिकअप चालक विनोद सावळे राहणार ,तालुका -चिखली ,जिल्हा बुलढाणा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरवडी हे करीत आहेत.
या गुन्ह्याच्या घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे व डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी भेट दिली.