शिवप्रहार न्यूज -रेमडीसीवीरचा काळा बाजार करणार्यांवर नगर LCB ची धडक कारवाई ...
रेमडीसीवीरचा काळा बाजार करणार्यांवर नगर LCB ची धडक कारवाई ...
नगर – LCB पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारे तीन आरोपी ,वाहन आणि तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असे एकूण ७ लाख ३२ हजार ८५० रुपये किमतीचे मुद्देमालासह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. हेमंत दत्तत्राय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की ०२ मे २०२१ रोजी पोनि. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, तारडे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, अहमदनगर व काकासाहेब म्हस्के मेडीकल कॉलेज कमान, एमआयडीसी, अहमदनगर या परिसरात काही इसम हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता कोव्हिड- १९ या आजारावर लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करीत आहेत .अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि.श्री. अनिल कटके यांनी त्यांचे पथकातील सपोनि दिवटे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर सपोनि सोमनाथ दिवटे यांनी श्री. विवेक खेडकर, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांना लेखी पत्राव्दारे सदरची माहिती कळवून त्यांना कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात बोलावून घेतले. पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि मिथून घुगे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ विश्वास बेरड, संदीप घोडके, पोना सुरेश माळी, शंकर चौधरी, पोकॉ सागर ससाणे, रविन्द्र पुंगासे, मयूर गायकवाड तसेच श्री. विवेक खेडकर, औषध निरीक्षक अशांनी मिळून कारवाईचे नियोजन करुन रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या इसमाचे मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाचे मध्यस्थीने संपर्क करुन रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत विचारपूस केली असता सदर इसमाने एका इंजेक्शनची किंमत २७, हजार रुपये सांगीतले. यावेळी सदर इसमास इंजेक्शन खरेदीसाठी होकार दिला असता सदर इसमाने १० ते १५ मिनीटांनी तारडे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, अहमदनगर परिसरात या असे सांगीतल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बनावट ग्राहक इंजेक्शन खरेदीसाठी पाठवून दोन पंचासह तारडे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, अहमदनगर या हॉस्पिटलचे बाहेर सापळा लावून एक इसमास स्कार्पिओ जिपसह ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये पॉलीफार्मा कंपणीचे एक रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल व स्कार्पिओ जिप नं. एमएच-१४-डीटी-९३२३ असा एकूण ७,१२,४००/-रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे इंजेक्शन हे महेश दशरथ मते, रा. बरबडे वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर व प्रदीप मारुती मगर, व अमर शिंदे, दोघे रा. तागड वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर या तिघांनी मिळून दिले असल्याचे सांगीतल्याने त्यांचा त्यांचे राहते घरी शोध घेतला. परंतू ते मिळून आले नाहीत. सदर बाबत श्री. विवेक पांडूरंग खेडकर, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 ३३१/२०२१, भादवि कलम ४२०, ३४ सह परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी) तसेच जिवनावश्यक वस्तूचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन दंडणीय कलम ७(१)(ए) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडणीय कलम २७ (बी)(ii) कलम १८(ए) व कलम २२(१) (cca) चे उल्लंघन अनुक्रमे २८(ए) व कलम २७ (डी) अन्वये आरोपी नामे १) हेमंत दत्तात्रय कोहोक, वय- २१ वर्षे, रा. सनफार्मा स्कूल जवळ, बोल्हेगांव, अहमदनगर, २) महेश दशरथ मते, रा. बरबडे वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर, ३) प्रदीप मारुती मगर, ४) अमर शिंदे, दोघे रा. तागड वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर यांचे विरुध्द दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास तोफखाना पो.स्टे. करीत आहेत.
त्यानंतर काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणासाठी येणाऱ्या इसमाचे मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाचे मध्यस्थीने संपर्क करुन रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत विचारपूस केली असता सदर इसमाने एका इंजेक्शनची किंमत ३२,०००/-रु. सांगीतले. त्यावेळी सदर इसमास इंजेक्शन खरेदीसाठी होकार दिला असता सदर इसमाने १० ते १५ मिनीटांनी काकासाहेब म्हस्के कॉलेज कमान, एमआयडीसी परिसरात या असे सांगीतल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बनावट ग्राहक इंजेक्शन खरेदीसाठी पाठवून दोन पंचासह काकासाहेब म्हस्के कॉलेज कमान जवळ सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच पंच व श्री. विवेक खेडकर, औषध निरीक्षक यांची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) भागवत मधूकर बुधवंत, वय- २० वर्षे, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव, अहमदनगर, २) अदित्य बाबासाहेब म्हस्के, वय- २१ वर्षे, रा. माताजीनगर, एमआयडीसी, अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे दोघांचे अंगझडतीमध्ये सनफार्मासिटीकल कंपणीचे एक व सिप्ला कंपणीचे एक असे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल असा एकूण २०,४५०/-रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे इंजेक्शन हे अंकीत कालिका मोर्य, रा. गुरुकृपा कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर याने दिले असल्याचे सांगीतल्याने त्याचा त्याचे राहते घरी शोध घेतला. परंतू तो मिळून आले नाहीत.सदर बाबत फिर्यादी श्री. विवेक पांडूरंग खेडकर, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर एमआयडीसी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २६५/२०२१, भादवि कलम ४२०, ३४ सह परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी) तसेच जिवनावश्यक वस्तूचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन दंडणीय कलम ७(१)(ए) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडणीय कलम २७ (बी)(ii) कलम १८(ए) व कलम २२(१) (cca) चे उल्लंघन अनुक्रमे २८(ए) व कलम २७ (डी) अन्वये आरोपी नामे १) भागवत मधूकर बुधवंत, वय- २० वर्षे, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव, अहमदनगर, २) अदित्य बाबासाहेब म्हस्के, वय- २१ वर्षे, रा. माताजीनगर, एमआयडीसी, अहमदनगर, ३) अंकीत कालिका मोर्य, रा. गुरुकृपा कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. करीत आहेत.