शिवप्रहार न्युज - शिर्डी संस्थानने भक्तांनी अर्पण केलेले विदेशी चलन स्विकारावे-माजी विश्वस्त प्रताप नाना भोसले…
शिर्डी संस्थानने भक्तांनी अर्पण केलेले विदेशी चलन स्विकारावे-माजी विश्वस्त प्रताप नाना भोसले…
शिर्डी - साईबाबांच्या चरणी साईभक्तांना अर्पण करावयाचे असलेले विदेशी चलन संस्थानने स्विकारावे याकरिता सुचना होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन व केंद्रीय अर्थराज्य मंत्री श्री. भागवत कराड यांना शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त तथा प्रसिदध उदयोगपती श्री. प्रताप नाना भोसले यांनी नुकतेच निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,शिर्डी येथील साई मंदिर हे जगभरातील करोडो लोकांचे श्रदधास्थान आहे. रोज हजारो साईभक्त भक्तीभावाने शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता येत असतात.त्यामध्ये परदेशी भाविक देखील येतात.तसेच परदेशात स्थायिक झालेले भाविक देखील येतात. तरी या भाविकांना साईबाबांच्या चरणी विदेशी चलनातील रक्कम अर्पण करावयाची असते पंरतू संस्थान हि रक्कम स्विकारत नसल्याने या भाविकांची दान अर्पण करण्याची इच्छा अपुरी राहते आहे. त्यामुळे साईबाबांच्या चरणी साईभक्तांना अर्पण करावयाचे असलेले विदेशी चलन संस्थानने स्विकारावे याकरिता सुचना होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन व केंद्रीय अर्थराज्य मंत्री श्री. भागवत कराड यांना शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त तथा प्रसिदध् उदयोगपती श्री. प्रताप नाना भोसले यांनी मागणी केली आहे.
जेणेकरून विदेशी चलन दान स्वरूपात अर्पण करावयाची साईभक्तांची इच्छा अपूर्ण राहणार नाही. तसेच पीआरओ ऑफिसमधील काही लोकांनी साईभक्तांना अडथळा निर्माण करू नये, विदेशातील साईभक्तांना साईबाबांच्या ऑनलाईन आरतीचा लाभ मिळावा यासाठीची सुविधा देखील उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त तथा प्रसिदध् उदयोगपती श्री. प्रताप नाना भोसले यांनी साईभक्तांच्या करिता केली आहे.