शिवप्रहार न्यूज- कोर्टाने पॉक्सो केसमध्ये बलात्काराच्या आरोपीस जामीन नाकारला...
कोर्टाने पॉक्सो केसमध्ये बलात्काराच्या आरोपीस जामीन नाकारला...
श्रीरामपूर/(प्रतिनिधी)-
नेवासा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अलिम शेख हयाचा जमिन नाकारला आहे. अलिम शेख ह्याच्यावर१५वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.सदरील प्रकरणात आरोपीने जमिन मिळण्याकरिता अर्ज केला होता.त्या संदर्भात बचाव पक्षाच्या वकिलाने आरोपीचा जोरदार बचाव केला परंतु सरकारी वकील व मूळ फिर्यादीने नेमलेल्या खाजगी वकील अँड, राजेश्वर भास्कर यांनी जामिनाच्या विरुद्ध व्यक्तिवाद करत प्रथम दर्शनी केस असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणले त्या आधारावर मा. कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
त्यामध्ये मूळ फिर्यादी तर्फे
अँड. राजेश्वर भास्कर व वर्षा.पी.गागरे यांनी काम पाहिले.