शिवप्रहार न्युज - नेवासा येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे गुन्हेगारांचे टोळीस SP श्री.राकेश ओला यांनी ०२ वर्षाकरीता केले हद्दपार…

शिवप्रहार न्युज -  नेवासा येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे गुन्हेगारांचे टोळीस SP श्री.राकेश ओला यांनी ०२ वर्षाकरीता केले हद्दपार…

नेवासा येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे गुन्हेगारांचे टोळीस SP श्री.राकेश ओला यांनी ०२ वर्षाकरीता केले हद्दपार…

नेवासा-नमुद बातमीतील हकीगत अशी की, टोळीप्रमुख अ.नं. 1) नदिम सत्तार चौधरी, रा. नाईकवाडी, मोहल्ला, नेवासा, ता. नेवासा, जि. नगर व टोळीसदस्य 2) फिरोज अन्सार देशमुख, रा. सदर 3) शोएब अलिम खाटीक, रा. सदर 4) खलील उस्मान चौधरी, रा.सदर 5) अबु शहबुद्दीन चौधरी, रा.सदर 6) मोजि उर्फ मोइज अबु चौधरी, रा. सदर 7) जबी लतिफ चौधरी, रा.सदर 8) अन्सार सत्तार चौधरी, 9) अकिल जाफर चौधरी, रा. सदर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन हद्दित व अहमदनगर जिल्हा परिसरात टोळीचे वर्चस्व कायम राहावे याकरीता गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी तस्करी करणे, गोवंशीय जनावरांना अमानुषपणे वागणुक देवुन त्यांना विना चारा पाण्यापाचुन डांबुन ठेवणे, त्यांची कत्तल करणे, धार्मिक भावना दुखावणे, जिवीतास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असणारे गुन्हे करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे सन 2018 ते 2023 या कालावधीत सराईतपणे केलेले आहेत.

       या टोळीच्या गैर कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी कायदेशीर कारवाई करुन व प्रतिबंधक कारवाई करुनही टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत टोळी विरुध्द कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नाही व नेवासा पो.स्टे हद्दीत व परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे सुरक्षिततेसाठी तसेच टोळीची असलेली दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार अहमदनगर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव इकडील प्राधिकणाकडे सादर केला होता. 

       सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर विभाग यांनी चौकशी करुन शिफारस अहवाल सादर केला होता. 

 सदर प्रस्तावाची श्री.राकेश ओला, हद्यपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी सखोल चौकशी करुन टोळीप्रमुख अ.नं. 1) नदिम सत्तार चौधरी, रा. नाईकवाडी, मोहल्ला, नेवासा, ता. नेवासा,जि. अहमदनगर व टोळीसदस्य 2) फिरोज अन्सार देशमुख, रा.सदर (3) शोएब अलिम खाटीक, रा.सदर 4) खलील उस्मान चौधरी, रा.सदर 5) अबु शहबुद्दीन चौधरी, रा.सदर, 6) मोजि उर्फ मोइज अबु चौधरी, रा. सदर, 7) जबी लतिफ चौधरी, रा. सदर, 8) अन्सार सत्तार चौधरी, 9) अकिल जाफर चौधरी, रा. सदर यांना अहमदनगर जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्यपार केले आहे.   

यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ. क्र. पोलीस स्टेशन गु. र. नं. व कलम

1) श्रीरामपुर तालुका 08/2018 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि.1960 चे कलम 5,9 प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि. 1995 चे कलम 11 प्रमाणे.

2) नेवासा 67/2018 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे कलम 5 (1) (अ) 9 प्रमाणे.

3) नेवासा 929/2020 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि. 1960 चे कलम 3/11 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि. 1995 चे कलम 5 (अ) (ब) 9 प्रमाणे.

4) नेवासा 316/2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे क.5 (अ) 9 (अ) सह मोटार वाहन अधि. क. 184

5) नेवासा 1040/2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे कलम 5 (अ) (1) 9 प्रमाणे.

6) नेवासा 72/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे कलम 5 (अ) 9 प्रमाणे.

7) नेवासा 644/2023 भादविक 269 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे कलम 5, 9 (अ) प्रमाणे.

8) नेवासा 702/2023 भादविक 269,34 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि.1995 चे कलम 5 (अ) (1) 9 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि.1960 चे कलम 3,11 प्रमाणे.

9) नेवासा 850/2023 भादविक 295,295 (अ) महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत व औद्योगीक नगर अधि. 1965 चे कलम 269,270 प्रमाणे.

       अहमदनगर जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील अशा प्रकारचे गोवंश जनावरांच्या संदर्भात गुन्हे करणारे, शरीराविरुध्द व मालाविरुध्द तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांची टोळीची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, तथा हद्दपार प्राधिकरण अहमदनगर यांनी दिलेले आहेत.