शिवप्रहार न्युज - कोल्हारमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंदू समाजाच्यावतीने लोणी पोलीसांकडे तक्रार….
कोल्हारमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंदू समाजाच्यावतीने लोणी पोलीसांकडे तक्रार….
कोल्हार/लोणी- श्री.क्षेत्र कोल्हारमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंदू समाजाच्यावतीने लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला असुन त्यात खालीलप्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
विनंती पुर्वक निवेदन अर्ज करतो की, कोल्हार भगवतीपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री, गोमांस विक्री खुलेआम चालु असुन या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसा उपलब्ध होत असून गावातील वातावरण दुषित होत असल्यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे.गोरगरीबांना विनाकारण मारहाण होत असून त्यांचेवर निष्कारण खोटे गुन्हे दाखल करून त्यांचेवर दहशत निर्माण करून त्रास दिला जातो व गावाचे वातावरण दुषित करण्यात येत आहे. तसेच श्री भगवती देवी मंदिराच्या परिसरात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु असुन येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना छळणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.तरी मा. पोलीस निरीक्षक,लोणी यांनी या विषयाला गांभीर्याने घेऊन अवैध धंदे त्वरीत बंद करावेत अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार राहील.
आपला विश्वासू
सकल हिंदु समाज, कोल्हार भगवतीपूर
अशा आशयाचे हे तक्रार अर्जातील निवेदन आहे.