शिवप्रहार न्यूज- पोलीस पाल्य व पारधी समाजातील तरुणांसाठी नगर पोलिसांकडून रोजगार मेळावा-SP श्री.मनोज पाटील…
पोलीस पाल्य व पारधी समाजातील तरुणांसाठी नगर पोलिसांकडून रोजगार मेळावा-SP श्री.मनोज पाटील…
नगर - नगर जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारी यांच्या मुला -मुलींसाठी तसेच होमगार्ड व पारधी समाजातील तरुणांसाठी 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता नगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालय येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ समाजसेवक हजारे व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॅा.श्री.बी.जी.शेखर पाटील यांच्या सह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख (SP)श्री.मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
वय वर्ष 35 च्या आतील तरुणांना या मेळाव्यात सहभागी होता येणार असून किमान पाचवी शिकलेला पारधी समाजातील राज्यात कुठेही राहणारा व्यक्ती यासाठी पात्र असणार आहे.जवळपास 3000 तरुण व 70 कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके हे देखील उपस्थित होते.