शिवप्रहार न्यूज-जिल्हा रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.पोखर्रणांची हकालपट्टी;तपास Dysp मिटके यांच्याकडे वर्ग…

शिवप्रहार न्यूज-जिल्हा रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.पोखर्रणांची हकालपट्टी;तपास Dysp मिटके यांच्याकडे वर्ग…

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.पोखर्रणांची हकालपट्टी;तपास Dysp मिटके यांच्याकडे वर्ग…

नगर- जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला (ICU) शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु रजि नं 981 / 2021 भा दं वि कलम 304 (अ ) अन्वये गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावरच शनिवारी दाखल करण्यात आला आहे.

          गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक श्री.संदीप मिटके , श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार - अहमदनगर शहर विभाग ) यांचेकडे वर्ग केला आहे.

          घटनास्थळी अद्यापपावेतो केंद्रीय आरोग्य मंत्री,

महा.राज्य आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे,

पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ,

महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात,

जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील,

नगरविकास , ऊर्जा , आदिवासी विकास , आपत्ती व्यस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री श्री.प्राजक्त तनपुरे

मृदा व जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांच्यासह 

विभागीय आयुक्त नाशिक श्री.राधाकृष्ण गमे,

पोलीस उपमहानिरीक्षक श्री.बी जी शेखर,

अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले,

पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील,

अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अगरवाल आदींनी भेटी दिल्या आहेत.    

              दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुनिल पोखरणा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

          पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.