शिवप्रहार न्युज - डॉ.रविंद्र कुटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्या-IMA ची मागणी…

शिवप्रहार न्युज -  डॉ.रविंद्र कुटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्या-IMA ची मागणी…

डॉ.रविंद्र कुटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्या-IMA ची मागणी…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- डॉ.रविंद्र कुटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA)वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

       पोलिस निरीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ.रविंद्र कुटे हे ४० वर्षांपासून सातत्याने श्रीरामपुरात रुग्णसेवेचे काम करत आहेत. डॉ. कूटे यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा दाखल झाल्याने सर्व वैद्यकीय सेवा करणाऱ्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहे. सदर रुग्णाने दाखल केलेला गुन्हा हेतुपुरस्सर केला आहे. स्त्री रूग्णांची तपासणी करताना गरजेच्या वैद्यकीय नियमावलींची तंतोतंत काळजी डॉ. कुटे यांनी घेतलेली आहे, असे असतांनाही अशाप्रकारे खोटा गुन्हा दाखल होणे ही संपूर्ण वैद्यकीय व्यवसायिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अशाप्रकारे वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर भविष्यात महिला रुग्णांवरती उपचार करतांना अडचणीची परिस्थीती निर्माण होऊ शकते. 

        शहरात मोठ्या प्रमाणात रेडिओलॉजीस्ट, गायनोलॉजीस्ट, सर्जन, प्रसुतीतज्ज्ञ, दंत चिकीत्सक इत्यादी तसेच अनेक स्त्री रोग तज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्रात असुन ते मोठ्या प्रमाणात पुरूष डॉक्टर आहेत.

         डॉ. कुटे यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यामुळे महिला रूग्ण तपासताना अडथळे व भीती निर्माण होत आहे. शहरात गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर खोटे-नाटे श्री गुन्हे दाखल करून खंडणी चे वसुलीचे सत्र सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश सदावर्ते, सचिव डॉ. संकल्प शिरसाठ, खजिनदार डॉ. प्रफुल्ल देशपांडे, डॉ. अतुल कारवा, उपाध्यक्षा डॉ. उज्वला कवडे, डॉ. मोनिका संचेती, डॉ. दिलीप शेजवळ, डॉ. संतोष मोरे आदींची निवेदनावर नावे आहेत.