शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील तीघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील तीघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले...

श्रीरामपुरातील तीघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- रांजणगांव खु, ता.राहाता येथील भारत संचार निगम लिमिटेड टेलीफोन एक्सचेंज मधील बॅटरी चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना १६ बॅट-या आणि पिकअप अशा एकुण ५,२५,६००/- रुपयांच्या मुद्देमालासह श्रीरामपूरातील वार्ड नं.२ मधून स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३१/०३/२३ रोजी फिर्यादी योगेश चंद्रकांत झाडीकर, वय ३८, धंदा नोकरी, रा.बीएसएनएल स्टाफ क्वॉर्टर, ता. राहाता यांचे गणेशनगर जिल्हा परिषद शाळे समोर, रांजणगांव, ता. राहाता येथे असलेले बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंजचे खोलीचा कडीकोयडा तोडुन आत प्रवेश करुन खोलीतील २५,६००/- रुपये किंमतीच्या १६ स्क्रॅप बॅट-या अनोळखी इसमांनी चोरुन नेल्या होत्या. सदर घटने बाबत राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. ९९२ / २०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्हा उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि.हेमंत थोरात, पोहेकॉ.मनोहर गोसावी, पोका.सागर ससाणे, मयुर गायकवाड, रोहित येमुल, जालिंदर माने व चापोहेकॉ.बबन बेरड असे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बॅटरी चोरीचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती घेत असतांना पोनि.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे लुकमान शहा याने त्याचे दोन साथीदारासह केला असुन चोरी केलेल्या बट-या पांढरे रंगाचे पिकअप टेम्पोमध्ये भरुन विक्री करण्यासाठी फातिमानगर, श्रीरामपूर येथे येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि.दिनेश आहेर यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.

  स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वॉर्ड नं. २, फातिमानगर, श्रीरामपूर येथे जावुन सापळे लावुन थांबलेले असतांना थोडा वेळात एक पांढरे रंगाचा पिकअप येतांना दिसला. त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता त्यांने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. गाडीत तीन इसम बसलेले दिसले त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) लुकमान इसाक शहा, वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर, २) वसीम गफार शेख, वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर व ३) राजीक असिक पठाण, वय २९, रा. काझीबाबा रोड, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील पिकअपची पंचासमक्ष झडती घेतली असता पिकअपमध्ये बॅट-या मिळुन आल्या त्याबाबत ताब्यातील संशयीतांकडे विचारपुस करता सुरुवातीस ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी करता त्यांनी रांजणगांव, ता. राहाता येथील बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंज मधील चोरी केलेल्या बॅट-या विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. तीनही आरोपींना २५,६००/- रुपये किंमतीच्या १६ बॅट-या व ५,००,०००/- रुपये किंमतीचा पांढरे रंगाचा एक पिकअप असा एकुण ५,२५,६००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कायदेशिर कारवाई राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.

   सदरची कारवाई मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा.संजय सातवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग अतिरिक्त प्रभार शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.