शिवप्रहार न्युज - आम आदमी पक्षासह जिल्हा आंदोलनाला श्रीरामपुरातील प्रसिद्ध डॉक्टर मंडळींचा पाठिंबा...

शिवप्रहार न्युज -  आम आदमी पक्षासह जिल्हा आंदोलनाला श्रीरामपुरातील प्रसिद्ध डॉक्टर मंडळींचा पाठिंबा...

आम आदमी पक्षासह जिल्हा आंदोलनाला श्रीरामपुरातील प्रसिद्ध डॉक्टर मंडळींचा पाठिंबा...

श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागणींसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त श्री. प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहारप्रमुख, माजी PSI श्री.सुरजभाई आगे,कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.    

         आज आंदोलनाच्या ०८ व्या दिवशी आम आदमी पक्षासह श्रीरामपुरातील प्रसिद्ध,नामांकित डॉक्टरांनी पाठिंबा दिला.त्यामध्ये शहरातील हृदयरोगतज्ज डॉ. दिलीप शिरसाठ,सर्जन डॉ. संजय अनारसे,डॉ.संकेत मुंदडा,बालरोगतज्ञ डॉ.प्रशांत जठार ,पोटविकारतज्ज्ञ डॉ.डी.एन.राहींज,डॉ.संकल्प शिरसाठ,डॉ.डी.पी. खपके, डॉ.मनोज संचेती,दंतरोगतज्ञ डॉ. अजित घोगरे,डॅा.सचिन पांडे यांचा सामावेश आहे.शहरातील या सर्व नामांकित डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन आंदोलनाचे स्वागत केले.

          तसेच भैरवनाथनगर ग्रामपंचायत चे सरपंच प्रवीण पा. फरगडे यांच्यासह आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे पाटील ,भरत डेंगळे पाटील, भैरव मोरे ,प्रशांत बागुल ,मनोज गाडे ,डॉक्टर प्रवीण राठोड यांनी पाठिंबा दिला.आगाशे सोशल हेल्थ क्लबचे संदेश गोर्डे,राहुल रणपिसे अभिजीत राऊत,श्रीराम दळवी ,प्रदीप उंडे ,नाऊरचे किरण देसाई, ऋषिकेश पवार,भोकरचे प्रणय पठारे,मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचे शुभम आढाव,पुणतांबाचे अशोक इंगळे निखिल वहाडणे, मालुंजाचे अरुण बोरुडे,परमपूज्य सद्गुरु श्री.देवेंद्रनाथ सेवा ट्रस्ट,नेवासाचे चंद्रशेखर सखाराम गोरे,चंद्रकांत जाधव यांनी समक्ष भेटून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दिवसेंदिवस आंदोलनाला सर्वस्तरातुन पाठिंबा वाढतच चालला आहे.