शिवप्रहार न्युज - धोकादायक डिपीबाबत वारंवार तक्रार करुनही महावितरणाचा निष्काळीपणा-नागरिकांचा आरोप

शिवप्रहार न्युज - धोकादायक डिपीबाबत वारंवार तक्रार करुनही महावितरणाचा निष्काळीपणा-नागरिकांचा आरोप

धोकादायक डिपीबाबत वारंवार तक्रार करुनही महावितरणाचा निष्काळीपणा-नागरिकांचा आरोप

अशोकनगर - दुकानलाईन विभागातील दत्त मंदिरच्या मागची DP ची लाईट जाण्याची समस्या कायम आहे.तेथील कटआउट पुर्णपणे निष्क्रिय स्वरुपाचा झालेला आहे आणि सर्व वायर उघड्यावर आहे.तसेच सर्व फेजच्या वायर खराब झालेल्या असुन त्यामुळे धोकादायक डीपीमुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

        तरी सदर DP वरील संपुर्ण कटआउट आणि सर्व फेजच्या वायर बदलण्याची अत्यंत गरज आहे,म्हणुन परिसरातील नागरिकांनी महावितरण च्या Email वर तक्रार दाखल करुनही महावितरणने दाखल केलेली तक्रार ही काही काम न करता क्लोज केली आहे असा आरोप नागरिक करत आहे.महावितरण किती दक्षतेने काम करते ? वायरमनला फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तर दिली जातात, सदर DP संदर्भात 24 तासाच्या आत काम पुर्ण न केल्यास अशोकनगर ग्रामस्यांच्या वतीने महावितरण कार्यालयावर जावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.