शिवप्रहार न्युज - जॉबचे अमिश दाखवून विवाहितेवर बलात्कार! आरोपी मुरकुटे फरार!!
जॉबचे अमिश दाखवून विवाहितेवर बलात्कार! आरोपी मुरकुटे फरार!!
नगर (शिवप्रहार न्युज) जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील एका ३८ वर्ष वयाच्या विवाहीत महिलेला “तुला जॉब लावतो” असे अमिष दाखवून तिच्या कागदावर सहया घेवून ५० हजार घेतले.तसेच तिला गाडीवर नेवून पुणे ,धुळे तसेच आळंदी येथील लॉजच्या खोलीत बळजबरीने बलात्कार केला.मोबाईलमध्ये त्याचे शुटींग करून ते व्हायरल करील अशी धमकी आरोपीने दिली.
पिडीत महिलेच्या वरीलप्रमाणे तक्रारीवरून आरोपी मंगेश भाऊसाहेब मुरकुटे,रा-शिरूर,पुणे याच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्रासिटी कलमाप्रमाणे श्रीगोंदा पोलीसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मंगेश मुरकुटे हा फरार झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी भारती हे करीत आहे.या घटनेने महाराष्ट्रात महिलांचे लैंगित शोषण कसे चालुच आहे. हे पुन्हा एकदा समोर आले आहे . तसेच या घटनेने खळबळ उडाली आहे .