शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचा सराईत गंठणचोर पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
श्रीरामपूरचा सराईत गंठणचोर पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- जिल्हयात जबरी चोरी (गंठनचोरी) चे ९ गुन्हे दाखल असलेल्या श्रीरामपूरच्या राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एलसीबीचे पोनि. दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींची माहिती काढुन त्यांना ताब्यात कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते. सदरचे पथक शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये फरार आरोपींची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी हा त्याचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ आरोपीचे राहते घरी येथे जाऊन खात्री केली असता, राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी, रा. इंदिरानगर, वॉर्ड क्रमांक ०३, श्रीरामपूर हा घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
सदर आरोपीवर दाखल गुन्हयांतील संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. ९३७/२०२३ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राजेंद्र भिमा चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी (गंठन चोरी) चे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. पथकाने ताब्यातील आरोपीस संगमनेर शहर पोलिसात दाखल गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व संगमनेर विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.