शिवप्रहार न्युज - उक्कलगाव ग्रामपंचायतीचा शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनास पाठिंबा...
उक्कलगाव ग्रामपंचायतीचा शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनास पाठिंबा...
श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातुन चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास आज १५ व्या दिवशी उक्कलगाव ग्रामपंचायतच्या वतीने लेखी पाठिंबा पत्र देण्यात आला.यावेळी भाऊसाहेब थोरात,अण्णासाहेब पुरुषोत्तम थोरात,प्रकाश नानासाहेब थोरात,प्रकाश अण्णासाहेब थोरात,रघुनाथ शिंदे,जगन्नाथ शिंदे इत्यादींच्या उपस्थितीत उक्कलगाव ग्रामस्थांच्यावतीने हे पत्र देण्यात आले. तसेच निपाणी वडगावचे प्रगतशील शेतकरी किरण पा.जगधने,केतन जगधने,बंटी कवडे मातापूरचे स्वप्निल शिरोळे,निलेश उंडे,गणेश पुजारी,जिजाऊनगर/ जाफराबादचे मनोज गहिरे,ऋषिकेश पवार,दीपक मेहत्रे यांनी देखील पाठिंबा दिला.
तसेच काल सायंकाळच्या सुमारास वैद्यकीय प्रतिनिधी (MR)संघटना,श्रीरामपूरचे सागर शेवाळे ,सत्विंदर सिंग ,मयूर शेवाळे,अमोल कुलकर्णी,आकाश पवार, उमेश तांबडे ,सागर कुलकर्णी, लक्ष्मण चौधरी,रितेश धुस्सा, नितेश इंगोले,सुरज शेरकर, किरण जगधने ,योगीराज ठोंबरे,क्षितिज पवार, प्रवीण कांबळे,अमित कुकरेजा यांच्यासह श्रीरामपूर लाकूड स्वॅामिल संघटनेचे कन्हैया सेवक,नारायणभाई पटेल, मनसुकलाल पटेल,वसंत पदमानी ,मोहनभाई पटेल, विनोदभाई चंदन,कांतीलाल पटेल,अर्जुन पटेल,श्रीरामपूरचे प्रसिद्ध वकील ॲड.हेमंत थोरात,उमेश तांबडे,गणराज बनकर,निलेश सातभाई,ॲड.पवार,शिरसाठ यांनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला.
कालच विशेष पाठिंबा म्हणून पुण्याचे प्रसिद्ध व नामांकित युट्यूबवर वकील ॲड. गणेश शिरसाट यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.