शिवप्रहार न्यूज- भोकरला बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला...

शिवप्रहार न्यूज- भोकरला बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला...

भोकरला बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर या गावांमध्ये असणारे शेतकरी दादासाहेब ज्ञानदेव मंडळके यांच्या वस्तीवर असलेल्या दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पडल्याची घटना घडली आहे.तसेच बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.

        गावालगत असलेल्या श्री. क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीवर ही घटना घडली असून शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.