शिवप्रहार न्युज - नगर नंतर श्रीरामपूर सर्वात मोठे शहर;वाहतुक शाखा पुन्हा सुरु करणार - नाशिक IG श्री.कराळे ...

शिवप्रहार न्युज -  नगर नंतर श्रीरामपूर सर्वात मोठे शहर;वाहतुक शाखा पुन्हा सुरु करणार - नाशिक IG श्री.कराळे ...

नगर नंतर श्रीरामपूर सर्वात मोठे शहर;वाहतुक शाखा पुन्हा सुरु करणार - नाशिक IG श्री.कराळे ...

श्रीरामपूर- नगर शहरानंतर श्रीरामपूर सर्वात मोठे शहर आहे. येथील वाहतूक शाखा का बंद करण्यात आली याबाबत माहिती घेवून ती पुन्हा सुरू करण्यासाठी चाचपणी केली जाईल असे नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.दत्तात्रय कराळे यांनी नुकतेच स्पष्ट केले.

         श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराळे यांनी शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.त्यावेळी हे वक्तव्य केले.तरी या निमित्ताने श्रीरामपूर हे सर्वार्थाने योग्य असे नवीन जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असणार हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

        दरम्यान आज दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने सुरू असलेल्या "शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा"ह्या मागणीसाठीच्या साखळी उपोषण आंदोलनाचा २९ वा दिवस आहे.