शिवप्रहार न्युज - धुणे धुणाऱ्या महिलेच्या नरडीचा बिबट्याने घेतला घोट; खळबळ...

शिवप्रहार न्युज -  धुणे धुणाऱ्या महिलेच्या नरडीचा बिबट्याने घेतला घोट; खळबळ...

धुणे धुणाऱ्या महिलेच्या नरडीचा बिबट्याने घेतला घोट; खळबळ...

   संगमनेर (शिवप्रहार न्युज)- आज बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास संगमनेर तलुक्यातील निमगाव टेंभी भागात राहणाऱ्या शेतकरी महीला संगीता शिवाजी वर्पे वय ४६ या आपल्या घरासमोरील नळाजवळ धुणे धुत असतांना गीन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून संगीता वर्पे यांच्यावर झडप घालून नरडेच धरले, महीला जोरात ओरडली मात्र बिबट्याने तिला गीन्नी गवतात ओढत नेले. तेथे लगेचच महिलेचे नातेवाईक व लोक धावले मात्र बिबट्या महिलेला सोडीना. शेवटी एकाने ट्रॅक्टर गीन्नी गवतात घातल्याने महिलेची बिबट्याच्या तावडीतून थरारक सुटका झाली.

   महिलेला दवाखान्यात नेले मात्र संगीता नावाच्या या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यात बिबट्यांनी लहान मुलांसह अनेकांचे बळी घेतले असून मागणी करूनही वन विभाग बेजबाबदारपणे पिंजरे लावत नाही. अशा अनेक तक्रारी वन विभागा बद्दल संतप्त नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेने नागरीकांमध्ये घबराट पसरली असून खळबळ उडाली आहे.