शिवप्रहार न्यूज-अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाला निवेदन;श्रीरामपुरातील अवैध धंदे बंद झाले नाही तर आमरण उपोषणाला बसणार…

अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाला निवेदन;श्रीरामपुरातील अवैध धंदे बंद झाले नाही तर आमरण उपोषणाला बसणार…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यामुळे श्रीरामपूरची नवतरुण पिढी व अनेक महिलांचे सुखी संसार उध्वस्त होत आहे.त्यामुळे काही नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी मा. प्रांत अधिकारी श्री.अनिल पवार, मा तहसीलदार श्री.प्रशांत पाटील,मा.पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे श्री.संजय सानप व पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे श्री.मधुकर साळवे यांना अवैध धंदे बंद करण्यात यावे याकरता निवेदन देण्यात आले आहे.
तसेच हे अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने आमरण उपोषण आयोजित केले जाणार असल्याचा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीच्या वतीने यावेळी देण्यात आला.या अवैध धंद्यांच्या संदर्भात मा.पोलीस अधीक्षक,नगर,मा.जिल्हाधिकारी,नगर,मा. विभागीय आयुक्त,नाशिक व मा.पोलीस महानिरीक्षक,नाशिक यांचे या प्रश्नाकडे आंदोलनाद्वारे लक्ष वेधणार असल्याचे या निवेदनात सांगण्यात आले आहे.