शिवप्रहार न्यूज-शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनाला आज 01 महिना पूर्ण;निषेध म्हणून मुंडन करणार...
शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनाला आज 01 महिना पूर्ण;निषेध म्हणून मुंडन करणार...
श्रीरामपूर -शहरातील बजरंगनगर,बेलापूररोड,श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा” ह्या मागणीच्या आंदोलनाला आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी एक महिना पूर्ण होत आहे.
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातून दि.16 ऑगस्ट 2024 पासून हे साखळी उपोषण आंदोलन सुरू झालेले आहे.तरी या आंदोलनाला एक महिना तथा 30 दिवस पूर्ण होत आले आहे.तरी प्रशासनाने आमच्या मागण्यांच्या संदर्भात अद्यापपर्यंत ठोस कृतिशील कार्यवाही केल्याचे अजून पर्यंत लेखी दिले नसल्याने आज आंदोलनस्थळी मुंडन आंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे शिवप्रहारप्रमुख,माजी पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे यांनी सांगितले.