शिवप्रहार न्यूज- विद्यार्थ्याला अश्लील चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवून शिक्षिकेचा विनयभंग.

शिवप्रहार न्यूज- विद्यार्थ्याला अश्लील चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवून शिक्षिकेचा विनयभंग.

विद्यार्थ्याला अश्लील चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवून शिक्षिकेचा विनयभंग...

लोणी - राहता तालुक्यातील लोणी -प्रवरानगर भागात एका शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या तरुण महिला शिक्षिकेचा अश्लील चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवून व फोटोची मागणी करून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

     अधिक माहिती अशी की,सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये फिर्यादी शिक्षिका महिलेने त्यांच्या फिर्यादीत सांगितले की,त्यांच्या एका विद्यार्थ्याला आरोपीने “अनुराग नामक ईमेल आयडी” वरून वेबसाईटवर त्यांच्याविषयीचे अश्लील चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवून व मेलद्वारे चॅटिंग करून फोटोची मागणी केली.

       त्यामुळे पीडित शिक्षिका महिलेने सायबर पोलिस ठाण्यात वरील ईमेल आयडी चालवणार्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

        सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्यामुळे सोशल मीडियावर तरुणींचे विनयभंग होण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.