शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात विसर्जनासाठी शहरातील ६ ठिकाणी कृत्रीम कुंड…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात विसर्जनासाठी शहरातील ६ ठिकाणी कृत्रीम कुंड…

श्रीरामपुरात विसर्जनासाठी शहरातील ६ ठिकाणी कृत्रीम कुंड…

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आवाहन करणेत येते की, पर्यावरणपुरक गणेश विसर्जन सोहळा साजरा करणेसाठी तसेच पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील १) थत्ते मैदान (कृत्रिम कुंड) २) कांदा मार्केट (कृत्रिम कुंड) ३) दहावा ओटा गणेश विसर्जन ठिकाण ४) नॉर्दन ब्रँच गणेश विसर्जन ठिकाण ५) अक्षय कॉर्नर गणेश विसर्जन ठिकाण ६) काळाराम मंदिर गणेश विसर्जन ठिकाण इत्यादी ०६ ठिकाणी गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रीम कुंड तयार करण्यात आलेले आहे. 

      सदर पीओपीच्या गणेशमुर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्या पाण्यात तशाच पडून राहतात. त्यामुळे मुर्तीची विटंबना होत असते.त्यामुळे नागरिकांनी नदी, धरण, तलाव व विहरीत विसर्जन न करता नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडातच मुर्ती विसर्जित करुन प्रदुषण कमी होण्यास मदत करावी असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले आहे.